सोन्या-चांदीच्या दरामध्ये महिन्यातील सर्वात मोठी ‘घसरण’, एकाच दिवसात झालं 5000 रूपयांपर्यंत ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. याच कारणामुळे स्थानिक बाजारात सोन्याचे दर 672 रुपये प्रति 10 ग्रॅमने पडले आहेत. तर, दिल्ली सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीची किंमत एकाच दिवसात 5,781 रुपयांपर्यंत घसरली आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, परदेशी बाजारात सोन्याचे दर 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरून एक महीन्यातील खालच्या स्तरावर आले आहेत. कॉमॅक्सवर सोने 1900 डॉलर प्रति औंसच्या खाली उतरले. मात्र, किंमतीमध्ये आणखी मोठ्या घसरणीची शक्यता दिसत आहे.

सोन्याचे नवे दर
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याचे दर 672 रूपयांनी घसरून 51,328 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत. याच्या मागील सत्रात म्हणजे सोमवारी व्यवसायाच्या अखेरीस सोने 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. अंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरणीसह 1900 डॉलर प्रति औंसवर बंद झाले.

चांदीचे नवे दर
गोल्डप्रमाणेच चांदीच्या किंमतीमध्ये सुद्धा मोठी घसरण दिसून आली. मंगळवारी एक किलोग्रॅम चांदीचे दर 5,781 रुपयांनी घसरून 61,606 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहेत. तर, यापूवी एक दिवस अगोदर सोमवारी चांदी 67,387 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

सोने-चांदीत का झाली घसरण
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी म्हटले, दिल्ली सराफा हाजिर बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 672 रुपयांनी घटला. तो अंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रीचा कल दर्शवतो. कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या शंकेने गुंतवणुकदारांनी डॉलरमध्ये सेफ इन्व्हेस्टमेंट खरेदी सुरू केली आहे. यासाठी अमेरिकन डॉलरमध्ये तेजीचा कल कायम आहे. अशा स्थितीमध्ये सोन्याच्या किंमती अजून घसरू शकतात.