दिवाळीची चाहूल लागताच सोनं-चांदी ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी सोन्याच्या किंमतीत तेजी आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मंगळवारी सोन्याच्या किंमती 50 रुपयांना वाढून 38,810 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की 24 कॅरेट हाजिर सोन्यांच्या मागणीत वाढ झाल्याने सोने मंगळवारी 50 रुपयांनी महागले.

ते म्हणाले की धनतेरसच्या सणानिमित्त सोन्याच्या दागिण्याची मागणी वाढली. सोमवारी सोने 38,760 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. चांदीच्या किंमती मंगळवारी वाढल्या, दिल्लीत चांदीच्या किंमती 160 रुपयांनी वाढून 46,690 रुपये प्रति किलोग्रॅम स्तरावर गेले. त्या आधी चांदी 46,530 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,488 डॉलर प्रति औंस होते. तर चांदी 17.64 डॉलर प्रति औंस होते. पटेल यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या. सोने जवळपास 1,488 डॉलर प्रति औंस राहिले. जागतिक आर्थिक परिस्थितीत सुधारणेच्या चिंतेने सोन्याच्या किंमतीत घसरणं होण्याची शक्यता कमी आहे. अमेरिका आणि चीन मधील कमजोर आर्थिक परिस्थिती देखील सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या घसरणीचे एक कारण मानले जाते.

जर तुम्ही धनतेरसला सोने खरेदी करु इच्छितात तर काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जसे की तुम्ही शुद्धता आणि हॉलमार्क तपासावा. सोने खरेदीनंतर दागिण्यावर तुम्हाला मेकिंग चार्ज देखील द्यावा लागतो. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करु इच्छितात तर सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेत गुंतवणूक करु शकतात. हा उत्तम पर्याय मानला जातो.

Visit : Policenama.com