सोनं खरेदी करताना ‘नुकसान’ टाळा, तज्ज्ञांच्या ‘या’ आयडियांचा वापर करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून  सोन्याने दराचा उच्चांक गाठला असून सोन्याचे दर 40 हजारांच्या वर गेले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. सणासुदीच्या तोंडावर या दरांमध्ये आणखी भाववाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे लग्नसराईच्या तोंडावर अशाप्रकारे सोन्याच्या  किमतीत होणारी भाववाढ सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे नागरिक सोने खरेदी करावे कि नाही या चिंतेत अडकले आहेत. मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी एकसाथ मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी न करता थोडे थोडे सोने खरेदी करावे.

जगात राजकीय संकट गडद झाल्याने आणि अनिश्चितता असल्यामुळे आणि अमेरिकेने आपल्या व्याजदरात कपात केल्याने हि भाववाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचबरोबर चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे देखील सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बाजारातील ही तेजी अशीच राहिली तर सोन्याचे दर पुढच्या काही दिवसांतच आणखी भडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करायचे असल्यास एक नवीन पद्धत सांगितली आहे.

अशा पद्धतीने करा सोनेखरेदी

ऑल इंडिया सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरिंदर जैन यांनी म्हटले आहे कि, शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्याने सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. तसेच जगातील अनेक देशांच्या सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याने हि भाववाढ होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत यामध्ये घसरण होण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे नागरिकांनी एकसाथ मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी न करता थोडे थोडे सोने खरेदी करावे. यावेळी सोन्याच्या खरेदीमध्ये देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला 100 ग्रॅम सोने खरेदी करायचे असल्यास ते एकसाथ खरेदी न करता 10-20 ग्रॅम सोने प्रत्येकवेळी करत तुम्ही सोने खरेदी करू शकता. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध थंडावल्यानंतर यामध्ये घट दिसून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –