‘धनतेरस’पर्यंत सोनं महागणार, गाठणार 40 हजारांचा टप्पा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करवा चौथनंतर आता धनतेरस आणि दिवाळीनिमित्त सराफ बाजारात पूर्ण तयारी करण्यात आली आहे. आनंदाचा आणि दिवाळीचा हा सण बाजारात समृद्धी येण्याची सुरुवात असते. आता सणासुदीला सराफ बाजारात मोठी गर्दी असेल. धनतरेसला लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते परंतू मागील काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार यात गुंतवणूक करण्याबाबत साशंक आहेत. त्यांना भिती आहे की सोन्यात एवढी वाढ तर झाली आहे परंतू अचानक सोन्यात घट होऊ शकते.

धनतेरसच्या दिवशी सोने पुन्हा एकदा 40,000 रुपयांचे पार जाऊ शकते. यंदा चांदीचे दर देखील 49,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या मागणीत झालेली वाढ सोन्या-चांदीच्या किंमतीत होत असलेल्या वाढीचे कारण आहे. परंतू स्थानिक बाजारात सोन्याची मागणी कमी आहे. एक अनुमानानुसार संपूर्ण वर्षात सोन्या-चांदीची जितकी खरेदी होते. त्याच्या 30 टक्के जास्त खरेदी ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या सणासुदीदरम्यान होते.

दिवाळीच्या 11 दिवसानंतर पुन्हा वाढणार सोन्याचे भाव
तज्ज्ञांच्या मते सोने खरेदीत अनिश्चित परिस्थिती आहे. परंतू सोने खरेदीसाठी ही वेळ योग्य आहे. कारण दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त असल्याने सोन्याच्या किंमती 40 हजार पार जाऊ शकतात. पवन गुप्ता यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबर स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढली नाही. बाजारात सोन्याची खरेदी कमी आहे. लोकांना सध्या सोन्यात गुंतवणूक करण्यास जास्त रुची नाही. परंतू सोन्याची मागणी दिवाळीच्या 11 दिवसानंतर वाढू शकते. कारण त्यानंतर लग्नाचे मुहूर्त असणार आहेत.

दिवाळीला डिजिटल गोल्ड देखील करु शकतात खरेदी
सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जर तुम्ही दिवाळीला सोने खरेदी करु इच्छित असाल आणि बजेट नसेल तर डिजिटल फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही सोने खरेदी करु शकतात. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून फिजिकल म्हणजेच खरे सोने आणि शुद्ध सोने डिजिटल फॉर्ममध्ये सुरक्षित करु शकतात.

चांदीच्या दरात उतार चढाव
कमोडिटी मार्केटचे एक्सपर्ट व्ही. चंद्रशेखर यांच्या मते जी परिस्थिती आहे त्यावरुन वाटते की सोन्याच्या दरात तेजी कायम राहिलं, परंतू त्याला देखील काही मर्यादा आहे. परंतू दरम्यान लग्नाचे मुहूर्त आहेत त्यामुळे या दरम्यान सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. चांदीत सध्या उतार चढावाची परिस्थिती आहे. चांदीत होणारी तेजी मूळ स्वरुपात औद्योगिक मागणीवर आधारित आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी