खुशखबर ! घरबसल्या ‘इथं’ पैसे ठेवुन FD पेक्षाही ‘चौपट’ फायदा मिळवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – मागील एक वर्षात भारतात सोन्याच्या दरात दिवसेंदिवंस वाढ होत आहे. कारण मुदत ठेवीवर मिळणारे रिटर्न कमी होत आहेत. मात्र सोन्याशी निगडीत असलेल्या गोल्ड ईटीएफ स्कीममध्ये पैसे गुंतविल्यास तुम्हाला ३८ टक्क्यांपर्यत परतावा मिळू शकतो. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या वाढत्या किमतीत होणारी वाढ सध्या थांबेल असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही गोल्ड इटीएफमध्ये पैसे गुंतविल्यास तुम्हाला चांगलाच नफा मिळू शकतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सचेंज ट्रेड फंड (इटीएफ) ही योजना म्युच्युअल फंडचीच एक योजना आहे. या योजनेची नोंदणी युनिट स्टॉक एक्सचेंजमध्ये केली जाते. देशातील इतर बॅंकांमध्ये सात टक्के व्याजदराने परतावा मिळत आहे. पण तुम्ही एक वर्षासाठी आरबीएल बॅंकेत ७.९ टक्के व्याजदराने दहा हजार रुपये गुंतविल्यास १०,८१४ रुपयांचा नफा मिळु शकतो. तर लक्ष्मी विलास बॅंकेत ७.७५ टक्के व्याजदराने पैसे गुंतविल्यास १०,७९८ रुपयांचा नफा तुम्हाला मिळू शकतो.

कोटक वर्ल्ड गोल्ड फंडने एका महिन्यात ३२ टक्के व्याजदाराने परतावा दिला आहे. तर डीएसपी वर्ल्ड गोल्ड फंडने एका वर्षांत ३८ टक्के व्याजदराने परतावा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही हा ट्रेंड सुरु असून जूनमध्ये सोन्याच्या किमती १३०० डॉलर प्रति तोळा दराने होत्या. त्यात ऑगस्टमध्ये १५०० रुपये प्रति तोळा दराने वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात जुनमध्ये सोन्याची किमंत ३३००० हजार रुपये प्रति तोळा होती. तर ऑगस्टमध्ये तिच्यात वाढ होऊन ३८००० रुपये प्रति तोळा इतकी झाली. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर भविष्यात सोन्याचे दर ४१ हजार रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

केडिया कमोडिचे अजय केडिया यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, फक्त चांगल्या परताव्यासाठी सोन्यात गुंतवणूक करु नये. तुम्ही खरेदी केलेले युनिट डिमॅट खात्यात जमा केले जातात. शिवाय गोल्ड एटीएफ कार्यक्षम असतात. त्यामुळे प्रत्यक्षात सोने ठेवण्याची गरज नसते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही बाजारभावाने याची विक्री करु शकता. गोल्ड ईटीएफ योजना ही सोन्यात गुंतवणूक करण्याचे सुरक्षित साधन आहे. तुमच्या गरजेच्या वेळी इटीएफच्या बाजारभावाच्या किमतीत तुम्हाला रोख रक्कम मिळते.

पैसे मिळविण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग आणि डिमॅट खाते समभाग ब्रोकरकडे सुरु करावे लागेल. लमसम किंवा सिस्टमॅटिक इनव्हेंटमेंट प्लॅनने काही कालावाधीच्या अंतराने तुम्ही खरेदी करु शकता किंवा तुम्ही एक ग्रॅम सोने देखील खरेदी करु शकता. यासर्वांसाठी तुम्ही शेअर ब्रोकरकडे तुमचे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडा. पासवर्ड आणि लॉगिनआयडी ला ब्रोकरच्या ऑनलाईन पोर्टलवर लॉगिन करुन तुम्हाला हवी असलेली खरेदी करा. हव्या असलेल्या युनिटसाठी तुमची खरेदीची ऑर्डर द्या. त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे वजा होऊन दुसऱ्या दिवशी डिमॅट खात्यात जमा केले जातील.

आरोग्यविषयक वृत्त –