Gold & Silver Update : दोन महिन्यात सोने 5500 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दारात 16000 रुपयाची घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सण- उत्सवाचा हंगाम सुरु झाला असला तरी मागणी नसल्याने सोन्या- चांदीच्या किमतीत वाढ होत नाही. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा 50 हजार 653 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. तर चांदी देखील 61 हजार 512 प्रतिकिलो पातळीवर बंद झाली. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसले. सोन्याचे आताचे दर प्रतितोळा 5500 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत प्रतिकिलो 16000 हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्या- चांदीच्या दराने आतापर्यंतची सर्वाधिक किंमत गाठली होती. सोने- चांदीने त्यांचा उच्चांक गाठला होता. सोन्याने प्रति तोळा 56 हजार 200 रुपयांची उच्चांकी गाठली होती. तर चांदी प्रतिकिलो 77 हजार 840 रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आतापर्यंत 5547 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी प्रतिकिलो 15844 रुपयांनी खाली आली आहे.

तर दुसरीकडे बाजारातील मागणीही कमी झाल्याने व्यापा-यांनी व्यवहार कमी केले आहेत.त्यामुळे वायदा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 0.09 टक्क्यांची घट झाली. सोने 50 हजार 665 प्रतितोळा राहिले. मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरचा सोन्याचा वायदा भाव 47 रुपयांनी घटला होता.

चांदीची मागणी वाढली
स्पॉट मार्केटमध्ये जोरदार मागणी असताना स्थानिक वायदा बाजारातील व्यापा-यांची मागणी वाढली होती. त्यामुळे चांदीचे दर 461 रुपयांनी वाढून 61 हजार 996 रुपये प्रतिकिलो झाले. मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव डिसेंबरच्या 461 रुपयांनी किंवा 0.75 टक्क्यावरून घसरून 61 हजार 996 रुपये प्रतिकिलोवर आला.

तज्ञ्ज्ञांचे काय म्हणतात
सोन्याची किंमत 50 हजार रुपयांच्या उंचीवरून खाली आली आहे. तर चांदी 60 हजार रुपयांच्या श्रेणीत आली आहे. येत्या काही दिवसात चढ-उतार चालूच राहतात, असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हीसचे कमोडीटी रिसर्च उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले.

केडिया कॅपिटलचे अजय केडीया म्हणाले, स्टिम्युल्स पॅकेज स्टॉक मार्केटसाठी स्टिराईड म्हणून काम करते. त्यामुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. परंतू त्याला नैसर्गिक म्हणता येणार नाही.

कसा ठरतो सोन्याचा भाव
सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. डॉलरची किंमत दिवसेंदवस वाढत जात आहे. त्यामुळे सोन्याच्या भावाने 45 हजार रुपयांचा टप्पा कधीच पार केला आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा घट होत चालला आहे. त्यामुळे लोकांचा सुरक्षित गुंतवणूकीसाठी सोन्याकडे कल वाढतांना दिसून येत आहे. सोन्याचा भाव ठरविण्याचा कायदेशीर मार्ग नाही. भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतो. शंभर वर्षापूर्वी 1919 साली लंडनच्या 5 मोठ्या बुलियन टेर्डर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव ठरवण्याची पध्दत सुरु केली.लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटीशांची सत्ता होती. त्या काळात मासा, गुंज, तोळा या परिमाणातच सोन मोजल जात असत. दशमान पध्दत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरुपात आला.

आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले 15 बॅंकर्स (बॅंका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबीऐ म्हणजे इंडियन बुलियन ज्वेलर्स अशोसिएशनचा मोठा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री असे दोन दर असतात. त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बॅंका परदेशी बॅंकाकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सेवाकर लागते,
अन ते डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात.त्यामुळे आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातील भावात फरक आढळून येतो.