सोन्यानं आज गाठला ‘विक्रमी’ दर, गेल्या 7 महिन्यात दरात 25 % वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज (शुक्रवार) सकाळी सोन्याच्या किंमतीने 50 हजार 870 हा उच्चांकी दर गाठला. तर 50 हजार 725 दर निच्चांक होता. वायदा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅमला 348 रुपयांनी वाढून 50 हजार 418 इतका झाला. मल्टी कोमोडिटी एक्सचेंजमध्ये डिलिव्हरी सोन्याच्या कराराची किंमत ऑगस्टमध्ये 340 रुपये म्हणजे 0.68 टक्क्यांनी वाढून 50 हजार 418 रुपये प्रति ग्रॅम झाला.

 

बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी नवीन खरेदी केल्यामुळे सोन्याची किंमत वायदा बाजारात वाढली. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.68 टक्क्यांनी वधारून ते 1877.80 डॉलर प्रति औंस झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढल्यानंतर गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 502 रुपयांनी वाढली. सोन्याच्या किंमतीमध्ये 10 ग्रॅममागे 51 हजारांचा टप्पा ओलांडला. मार्केट बंद होण्यापुर्वी सोन्याचा दर 50941 रुपये प्रति ग्रॅम इतके होते. तर चांदी 69 रुपयांनी घसरून 62760 प्रति किलोग्रॅम भाव होता.

या वर्षाच्या सुरुवातीस, सोन्याचे दर 10 ग्रॅम 39 हजार रुपये होते, जे आतापर्यंत 49500 च्या विक्रमी पातळीवर गेले आहेत. फ्युचर्स मार्केटमध्ये सध्या सोने 49 हजारांच्या पातळीवर आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एककीकड बँकांनी छोट्या उद्योगांना कर्ज देणे बंद केले आहे तर दुसरीकडे सोन्याच्या कर्जाची भरपाई करणाऱ्या कंपन्यांनी अशा कर्जदारांसाठी रेड कार्पेट घातलं आहे. आता अनेक लहान आणि मध्यम व्यावसायिक मालक त्यांच्या घरात ठेवलेल्या सोन्याकडं पहात आहेत, जेणेकरून ते सहजपणे कर्ज घेतील. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, दररोज सोन्याच्या कर्जाच्या वापरामध्ये जवळपास 30 ते 35 टक्के वाढ होते. मुथूट फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष जॉन मुथूट यांनी सांगितले की, सोन्याच्या वाढत्या किंमती कर्ज घेणाऱ्यांना खूप उपयुक्त ठरल्या आहेत आणि त्यांना अधिक कर्ज घेण्यास सक्षम करते.