‘या’ कारणामुळं सोनं 40000 ‘पार’, चांदी देखील ‘महागली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी आली आहे. एका दिवसात सोन्याचे दर 752 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले आहे. तर चांदी देखील 960 रुपये प्रति किलोग्रॅमने महागली आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानीच्या मृत्यूमुळे देशात तणाव वाढला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सोने खरेदीकडे वळत आहेत. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी आली आहे.

सोन्याचे दर –
शुक्रवारी दिल्ली सराफ बाजारात सोने 40,652 रुपयांवर पोहचले. तर गुरुवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 39,892 रुपयांनी पोहचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोने 1,547 डॉलर प्रति औंस तर चांदी 18.20 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचे दर –
चांदीचे दर देखील वाढले आहेत, चांदी 48,870 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. चांदी 960 रुपयांनी महागली.

का वाढले सोन्या चांदीचे दर –
HDFC सिक्‍यूरिटीजचे हेड (अ‍ॅडवायजरी-पीसीजी) देवर्श वकील यांनी सांगितले की जिओपॉलिटिकल टेंशनचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. अमेरिका आणि इराण मधील तणाव वाढल्याने कमोडिटीच्या किंमतीत तेजी आली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत तर सोन्याचे दरात तेजी आली आहे.

अमेरिकाने गुरुवारी रात्री इराणची राजधानी बगदादवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी मारले गेले. सुलेमानी बगदाद एअरपोर्टवर जात होते, या दरम्यान अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इराण समर्थित पॉप्युलर मोबीलाइजेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस देखील मारले गेल्याचे वृत्त आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/