पाकिस्तानमध्ये ‘हाहाकार’, भारतापेक्षा ‘दुप्पट’ किंमतीला विकलं जातंय सोनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही देशात महागाई वाढत गेली तर त्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. परिणामतः देशातील जनतेला गरीबीला सामोरे जावे लागते. त्यातच देशावर मोठे आर्थिक कर्ज असेल तर त्याची हालत खूप भयानक होते अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालेली आहे.

भारतापेक्षा पाकिस्तानात सोन्याची किंमत डबल
महागाईच्या विळख्यात पाकिस्तान अडकलेला असल्यामुळे इम्रान खान हतबल झाले आहेत, कारण पेट्रोल डिझेलच्या महागाई नंतर देशात सोन्याची किंमत आतापर्यतच्या सर्वात उच्चत्तम स्तरावर गेली आहे. गेल्या शुक्रवारपासून पाकिस्तानमधील सोन्याने उसळी मारायला सुरुवात केली आहे.

भारतामध्ये १० ग्रॅम सोन्याच्या किमतीची ३७,९२० रुपये मोजावे लागतात तर याच १० ग्रॅम सोन्यासाठी पाकिस्तानात तब्बल ८६,२५० रुपए मोजावे लागत आहेत. भारताच्या मानाने ही किंमत दुप्पट आहे.

कमकुवत अर्थव्यवस्थेचा परिणाम सर्वसामान्यांवर
जगामध्ये सोन्याच्या किमती वाढत असताना त्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या आर्थिक व्यवस्थेवर पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशातच पाकिस्तानने भारतातील उद्योग बंद केल्याचा मोठा फटका त्याच्या अर्थव्यवस्थेला भोगावा लागत आहे, मात्र याचा कोणताही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत नाही. वाढती महागाई आणि कमकुवत होत चाललेली अर्थव्यवस्था याचा सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या राहणीमानावर मोठा परिणाम दिसून येत आहे. रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींच्या तुटवड्याना सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे.

आरोग्यविषयक वृत्त