‘या’ कारणामुळं सलग दुसर्‍या दिवशी ‘महागलं’ सोनं-चांदी, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने आणि रुपया कमकुवत झाल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी दिल्ली सराफ बाजारात सोन्यांच्या किंमती वाढल्या. बुधवारी सोने 296 रुपयांनी महागले. तर चांदी देखील आज पुन्हा चकाकली आहे. चांदी आज 331 रुपयांनी महागली.

सोन्याचे दर –
बुधवारी सराफ बाजारात सोन्याचे दर 38,898 रुपयांवरुन वाढून 39,194 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मंगळवारी सोने 39,028 रुपये होते. तर सोमवारी दिल्ली सराफ बाजारात सोने 38,860 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

चांदीचे दर –
बुधवारी सराफ बाजारात चांदी 45,772 रुपयांवरुन वाढून 46,103 रुपये प्रति किलो ग्रॅम झाले. मंगळवारी चांदीचे दर 45,124 रुपयांवरुन 45,873 रुपये झाले होते.

का महागले सोने –
एचडीएफसी सिक्युरिटी अहवालानुसार डॉलर मजबूत होत आहे तर रुपया घसरत आहे. याचाच परिणाम सोन्याच्या किंमतीवर होताना दिसत आहे. येत्या काळात रुपया आणखी कमजोर झाला तर सोने 40 हजार पार करेल.

Visit :  Policenama.com