Gold Rates Today : सोन्याचे भाव पुन्हा घसरले, गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सोन्याचे भाव घसरल्याचं दिसून आलं. अमेरिकन बॉन्ड उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे हा परिणाम दिसला. गुंतवणूकदारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सकाळी ११ वाजता सोन्याचा भाव ४६५०० च्या पातळीवर होता. एप्रिलच्या डिलिव्हरी सोन्याच्या भाव एमसीएक्सवर७९ रुपयांनी घसरून ४६४४३ रुपयांवर बंद झाला. यावेळी ३० रुपयांच्या घसरणीसह ४६४९२ च्या पातळीवर व्यापार होता. जून डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आता १९ रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्रॅम ४६६९६ रुपयांच्या पातळीवर होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचे दर १.३५ डॉलरने घसरून प्रति औंस १,७९६.५५ डॉलरवर पोहोचला. तर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत प्रति औंस २८.०८ डॉलरवर होती. चांदीच्या भावाविषयी बोलायचं झालं तर आज चांदी वधारली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव ४९२ रुपयांच्या वाढीसह प्रति किलो ७००३५ च्या पातळीवर होता. तर मे डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव ५४८ रुपयांनी वाढून ७१३५५ रुपयांच्या पातळीवर होता.