खुशखबर ! सलग तिसर्‍या दिवशी सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आंतरराष्ट्रीत बाजारात काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. मात्र, आजही सलग तिसर्‍या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. स्थानिक सराफाबाजारात सोन्याच्या किंमती 210 रुपयांनी घसरून 51 हजार 963 झाल्या आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने 24 रुपयांनी कमी झाले आहे. त्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 51 हजार 755 रुपये झाला आहे. चांदीचा भाव 109 रुपयांनी कमी झाला असून तो एक किलोला 67 हजार 420 रुपये आहे.

चांगल्या आर्थिक आकड्यांमुळे अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ, कोरोना व्हायरसच्या उपचारासंदर्भात वाढणार्‍या आशा आणि अमेरिका-चीनमध्ये ट्रेड डीलची शक्यता या सर्वांमुळे सोन्याचांदीच्या दरावर दबाव वाढत आहे. याच संकेतांमुळे आज देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी होऊ शकतात. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1918 डॉलर प्रती औंस आहे.

चांदीचा भाव 0.9 टक्के घसरला असून तो प्रती औंस 26.45 डॉलर आहे. डॉलर इंडेक्समध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. बुधवारी कमॉडिटी बाजारात सोने 900 रुपयांनी वधारले होते. दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 52,907 रुपये प्रति तोळावरून कमी होऊन 55,350 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर, आज दिल्लीत 22 कॅरेट सोने 49 हजार 860 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 54 हजार 390 रुपये आहे. तर, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 410 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 51 हजार 410 रुपये आहे. चांदीचा भाव एक किलोसाठी 68 हजार 530 रुपये आहे.