सोन्या-चांदीच्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी सोने 53 रुपयांनी स्वस्त झाले. त्यामुळे सोने 39,007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. मागील आठवड्यात सोने 39,060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

चांदी देखील आज 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे. यामुळे चांदी 45,830 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. बुधवारी चांदी 45,850 रुपये प्रति किलोग्रॅम होती. उद्योगात आणि शिक्के व्यवसायात लिवाली कमी आल्याने चांदीचे भाव कमी झाले आहेत.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की दिल्लीमध्ये गुरुवारी सोने 24 कॅरेट हाजिर भाव 53 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले. पटेल म्हणाले की रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत असल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण आली आहे. ते म्हणाले की लग्नसराईमुळे मागणी वाढली आहे.

गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये सोन्यात किंचित तेजी आली. त्यामुळे 1472.70 डॉलर प्रति औंस झाली तर चांदी 17.10 डॉलर प्रति औंसवर पोहचली. पटेल म्हणाले की अमेरिका-चीन व्यापार करारामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल होत आहेत.

सोने वायदा किंमतीचा विचार केला तर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजून 36 मिनिटांनी सोने 5 डिसेंबर 2019 चा वायदा भाव 0.24 टक्के किंवा 90 रुपयांनी घसरले त्यामुळे 38065 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होता.

Visit : Policenama.com