सोनं-चांदी ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत शुक्रवारी वाढ झाली. शुक्रवारी सोने 143 रुपयांनी महागले. त्यामुळे दिल्लीत सोन्याचे दर 38,552 रुपये प्रति 10 किलो ग्रॅमवर पोहचले. रुपया डॉलरच्या तुलनेत घसरल्याने सोन्याच्या किंमतीत तेजी आली. गुरुवारी दिल्लीत सोने 38,552 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते.

सराफ बाजारात सोन्या प्रमाणेच शुक्रवारी चांदीच्या किंमतीत वाढ झाली. चांदी शुक्रवारी 108 रुपयांनी महागली. यामुळे चांदी 45,375 रुपये प्रति किलो झाली. गुरुवारी चांदी 45,267 रुपये प्रति किलो होती. औद्योगिक क्षेत्रात आणि शिक्के बाजारात तेजी आल्याने आज चांदीचे दर वाढले.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी सांगितले की शुक्रवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 143 रुपये तेजी आली आहे. ते म्हणाले की रुपयांच्या मुल्यात घसरण आल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतीत सोन्यात सकारात्मक वाढ झाल्याने सोन्याच्या भावात तेजी आली आहे.

पटेल म्हणाले की भारतीय रुपया शुक्रवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 25 पैशांची घसरण झाली. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किंमती वाढून 1,458 डॉलर प्रति औंस झाली तर चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली की 16.62 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

Visit : Policenama.com