‘तेजी’नंतर आता ऑगस्टमध्ये सोनं-चांदी 8000 पेक्षा जास्त ‘स्वस्त’, दर आणखी घसरण्याची शक्यता असल्याचं तज्ञांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्वने अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीबाबत चांगल्या आशा निर्माण केल्या आहेत. यामुळे अमेरिकन डॉलरच्या मोठ्या घसरणीनंतर आता सुधारणा होत आहे. त्याचाच परिणाम आता सराफा बाजारात म्हणजेच सोने आणि चांदीच्या किंमतींवर दिसून येत आहे. म्हणूनच ७ ऑगस्ट रोजी विक्रमी पातळी गाठल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घट चालू आहे.

यावेळी देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ४२०० रुपये आणि चांदी ८८६० रुपयांनी स्वस्त झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या दोन सत्रांमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरणीचे सर्वात मोठे कारण अमेरिकन सेंट्रल बँकेच्या फेडरल रिझर्व्ह मीटिंगचे तपशील होते. फेडच्या या तपशीलात असे सूचित केले जात आहे की, १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय बँकेच्या बैठकीत व्याजदर कमी राहू शकते.

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ शुद्ध सोन्याचा भाव ५३,०८४ रुपये प्रति १० ग्रामवरून ५२,९९० रुपयांवर आला. तर मुंबईत ९९.९ टक्के सोन्याचा भाव ५२,३९० रुपये प्रति १० ग्रामवर आला.

आणखी स्वस्त होऊ शकते सोने आणि चांदी
एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन आसिफ इकबाल यांचे मत आहे की, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. ते म्हणतात की, अमेरिकन डॉलरच्या मजबुतीचा परिणाम सोन्यावर होईल. तसेच जगभरातील गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळले आहेत.

ऑगस्टमध्ये सोने आणि चांदी किती स्वस्त झाले ?
ऑगस्टच्या पहिल्या व्यापार आठवड्यात सोन्याचा भाव २३०२ रुपये प्रति १० ग्राम आणि चांदी १०,२४३ रुपयांनी महागले. या मागचे कारण कोरोनाची वाढती प्रकरणे आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेचे वातावरण होते. ३ ऑगस्ट रोजी सोने ५३,९७६ रुपये प्रति १० ग्रामवर नव्या विक्रमासह बंद झाले आणि या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी शुक्रवारी म्हणजे ७ ऑगस्ट रोजी सर्वात उच्चांकावर पोचले. सोन्याचा हाजीर भाव या दिवशी ५६,१२६ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला. तर चांदीचा हाजीर भाव यादरम्यान ६४,७७० रुपयांवरून ७५,०१३ रुपये प्रति किलोवर आला.

ऑगस्टच्या दुसर्‍या व्यापार आठवड्यात (१० ते १४ ऑगस्ट दरम्यान) सोन्याच्या किंमती खाली येण्यास सुरुवात झाली. एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन प्रमुख आसिफ इकबाल यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये रशियाच्या लसीच्या सुरु होण्याच्या बातम्यांमुळे सोन्यातील नफ्यात वाढ झाली. १० ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोने ५५,५१५ रुपये प्रति १० ग्राम होते, ते १७ ऑगस्टपर्यंत २६४१ रुपयांनी घसरून ५२,८७४ रुपये झाले. तर चांदी ५८४० रुपयाने ६७,७६८ रुपये प्रति किलोग्रॅमवर आली. सध्याच्या आठवड्यातही सोने २००० रुपयांपेक्षा स्वस्त झाले आहे.