‘सोन्या’च्या किंमती 7 वर्षांतील ‘उच्चांकी’वर, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतींनी नवा विक्रम केला आहे. एमसीएक्सवर सोने वायदा भाव शुक्रवारी 470 रुपयांनी उसळून 42,509 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदी 48,410 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. शुक्रवारी सकाळी एमसीएक्स महाशिवरात्रीच्या सुट्टीमुळे बंद होते, परंतु संध्याकाळनंतर ट्रेडिंगसाठी सुरु झाले.

आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सोन्याच्या किंमती आज सात वर्षांच्या उच्चांकीवर पोहोचल्या. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोनं हाजिर भाव 0.93 टक्के म्हणजेच 15.05 डॉलर तेजीने 1,634.61 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम ट्रेंड करत होते.

सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे, ग्लोबल इकोनॉमीमध्ये असलेल्या संकटामुळे सोन्यात सुरक्षित गुंतवणूक होत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. चांदी हाजिर भाव शुक्रवार वाढला. चांदी 0.90 टक्के म्हणजेच 0.17 डॉलर तेजीने 18.53 डॉलर प्रति 28.34 ग्रॅमवर ट्रेंड झाली.

दुसरीकडे कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव होत आहे, हा प्रभाव कमी करण्यासाठी चीन उपाय करत आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या प्रमुख व्याज दरात कपात केली आहे.

You might also like