सोनं झालं ‘स्वस्त’, चांदी मात्र ‘महागली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या दरात आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी घसरण झाली. सोमवारी सोन्याच्या दरात 32 रुपयांनी घसरण झाली. दिल्लीत सोने 38,542 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. रुपया मजबूत होत असल्याने आज सोन्याचा किंमतीत घसरण झाली. शनिवारी दिल्लीत सोनं 38,574 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की आठवड्याच्या पहिल्या दिवशी 24 कॅरेट सोने 32 रुपयांनी घसरले. ते म्हणाले की रुपया मजबूतीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. ते म्हणाले की सोमवारी रुपया एका डॉलरच्या तुलनेत 7 पैशांनी मजबूत झाला.

सराफ बाजारात चांदीच्या किंमतीत आज वाढ होताना दिसली. चांदी सोमवारी 46 रुपयांनी महागली. यामुळे आज एक किलो चांदी 44,691 रुपये झाली. मागील सत्रात चांदी 44,645 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. औद्योगिक क्षेत्रात आणि शिक्के बाजारात लिवाली तेजी आल्याने चांदीच्या किंमतीत वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केला तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये सोने 1,462 डॉलर प्रति औंसवर तर चांदी 16.00 डॉलर प्रति औंस वर पोहचली. पटेल म्हणाले की जोखीम असल्याने सराफ बाजारात विक्री कमी आहे, ज्याचा परिणाम किंमतींवर होत आहे .

Visit : Policenama.com