खुशखबर ! सोनं – चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत आठवड्याच्या पहिल्याच सोमवारी चांगलीच घसरण पाहायला मिळाली. दिल्लीत सोमवारी सोने 166 रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे किंमतीत घट होऊन सोन्याचे भाव 38,604 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. शनिवारी सोने 38,770 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की सोमवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्यात 166 रुपयांची घसरण आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरणं आल्याने सोनं स्वस्त झाले आहे.

चांदीच्या किंमतीत देखील सोमवारी घसरण पाहायला मिळाली. चांदी सोमवारी 402 रुपयांनी स्वस्त झाली. यामुळे चांदी 45,178 किलो रुपये प्रति 1 किलोग्रॅम झाली. मागील सत्रात चांदी 45,580 रुपये प्रति किलोग्रॅम होती. औद्योगिक क्षेत्रात आणि शिक्के बाजारात लिलावी कमी झाल्याने चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात न्युयॉर्कमध्ये सोन्यात घसरण झाल्याने सोने 1,458 डॉलर प्रति औंस तर चांदी 16.86 डॉलर प्रति औंस झाली. पटेल म्हणाले की अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार करारामुळे सोन्याच्या हाजिर किंमतीत घसरण होऊन सोने 1,460 डॉलर प्रति औंस राहिल्याने स्थानिक सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरणं पाहायला मिळाली. अमेरिका-चीनमध्ये करार झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात शेअर बाजारात सोमवारी उत्साह पाहायला मिळाला.

Visit : Policenama.com