Gold Rate Today | विक्रमी स्तरापासून 8,700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदीची हीच संधी! जाणून घ्या आजचे दर

मुंबई : Gold Rate Today | आज सराफ बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. 24 कॅरेट सोने 135 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोने (Gold Rate Today) आपल्या विक्रमी स्तरावर म्हणजे 56 हजार 800 रुपये होते. म्हणजेच आता विक्रमी स्तरापासून सोने तब्बल 8 हजार 700 रुपयांनी खाली आहे.

सोन्याचे नवीन दर

काल 24 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 583 रुपये होता. आज सोने 135 रुपयांनी घसरून 47 हजार 448 रुपयांवर आले आहे. सोन्याचे दर कमी होत असल्याने ग्राहकांना खरेदीची चांगली संधी असल्याचे म्हटले जात आहे.

चांदीचा नवीन दर

चांदीच्या किमतीमध्येही काही अंशी घट झाली आहे. आज चांदी 63 हजार 657 रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत आहे. काल 17 ऑगस्ट रोजी चांदीचा दर 63 हजार 936 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सोने दिवळीपर्यंत पुन्हा 50 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. यामुळे आज सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. आजचे 14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे-

24 कॅरेट सोन्याचे दर- 47 हजार 448

23 कॅरेट सोन्याचे दर- 47 हजार 258

22 कॅरेट सोन्याचे दर- 43 हजार 462

18 कॅरेट सोन्याचे दर- 35 हजार 586

14 कॅरेट सोन्याचे दर- 27 हजार 757

हे देखील वाचा

Ayurvedic Herbs | ‘या’ आयुर्वेदिक औषधी वनस्पती आपल्या शरीराला आतून निरोगी ठेवतात, जवळपास देखील येणार नाही आजार; जाणून घ्या

Supreme Court | पत्नीला घटस्फोट देऊ शकता, मुलांना नाही; 4 कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  gold rate today gold price less in 135 rs today gold rate in mumbai 24 to 14 carat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update