वायदे बाजारात ‘सोन्या-चांदी’चा दर ‘वधारला’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या-चांदीचा वायदा भाव शुक्रवारी मोठ्या पातळीवर बंद झाला. एमसीक्स एक्सचेंजवर शुक्रवारी ५ जून २०२० चा सोन्याचा वायदा भाव १.११ टक्के किंवा ४८० रुपयाने वाढत ४३,७२० रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला. याशिवाय ५ ऑगस्ट २०२० ला सोन्याचा वायदा भाव शुक्रवारी एमसीक्सवर १.१४ टक्के किंवा ४९५ रुपयासह ४३,८६० रु. प्रति १० ग्रामवर बंद झाला.

सोन्यासह चांदीचाही वायदा भाव शुक्रवारी मोठ्या पातळीवर बंद झाला. एमसीक्सयावर ५ मे २०२० चा चांदीचा वायदा भाव शुक्रवारी ३.६१ टक्के किंवा १४३९ रुपयाच्या जबरदस्त तेजीसह ४१,३११ रु. प्रति किलोग्रॅमवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सायंकाळी सोन्याच्या हाजीर भावात वाढ झाली. ब्लूमबर्गच्या मते शुक्रवारी संध्याकाळी जागतिक हाजीर सोन्याचे भाव प्रति औस ०.२४ टक्क्यांनी किंवा ३.९५ डॉलरच्या तेजीसह १,६१७.९४ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. त्याचबरोबर चांदीच्या जागतिक हाजीर किंमतीत शुक्रवारी संध्याकाळी घट झाली असून शुक्रवारी चांदीचा भाव ०.५३ टक्क्यांनी किंवा ०.०८ डॉलरने घसरत १४.४१ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता.

जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीशिवाय अन्य मौल्यवान धातूंमध्ये प्लॅटीनमचा शुक्रवारी संध्याकाळी हाजीर भाव घसरून ७२२.५७ डॉलर प्रति औसवर होता. तर पॅलेडियमचा हाजीर भाव घसरून २१४८.५१ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन असल्यामुळे देशातील आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा वगळता सर्व औद्योगिक व व्यावसायिक कामे ठप्प झाली आहेत. लॉकडाऊनमुळे शुक्रवारी देशातील सोन्याचा हाजीर बाजार देखील बंद राहील.