Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा बदलले, जाणून घ्या आजचा दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MCXवर काल ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 51453 रुपयांवर बंद झाले आणि आज ते 106 रुपयांच्या वाढीसह 51559 रुपयांवर उघडले. सुरुवातीच्या व्यापारात सोन्याचा दर कमीतकमी 51483 रुपये आणि 51644 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. त्याचप्रमाणे डिसेंबर डिलिव्हरीचे सोनेही जोरदार उघडले. बुधवारी सोने 51626 च्या किमतीवर बंद झाले, तर आज ते 51785 च्या किमतीवर उघडले.

सोने – चांदी दरात वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चतेच्या वातावरणामुळे सराफा बाजारात सोन्याचे दरही गुरुवारी 608 रुपायांनी घसरले. तर चांदीही 1214 रुपयांनी घसरली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते सोन्याचे भाव 608 रुपयांनी घसरून 52463 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदी 1214 रुपयांनी घसरून 69242 रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 53071 आणि चांदी 70456 रुपये प्रतिकिलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1943.80 डॉलर आणि चांदीचा भाव 26.83 डॉलर प्रति औंस झाला.

मागणी घटल्याने सोन्याचे वायदा दर कमी
स्पॉट मार्केटमधील सोन्याची मागणी कमी झाल्याने सट्टेबाजारामध्ये विक्रीत फार उत्साह दिसून आला नाही. गुरुवारी वायदा बाजारातील सोन्याचे दर 0.79 टक्क्यांनी घसरून 51420 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. एमसीएक्सवरील फ्युचर्स दरामध्ये सोन्याचे वायदा 404 रुपये किंवा 0.78 टक्क्यांनी घसरून 51420 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. यासाठी 10142 लॉटची उलाढाल झाली. तसेच डिसेंबर मध्ये डिलिव्हरी रेटमध्ये 8192 लॉटच्या व्यवहारात किंमत 393 रुपये किंवा 0.76 टक्क्यांनी घसरून 51595 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 1.09 टक्क्यांनी घसरून 1949.10 डॉलर प्रति औंस झाले.

यंदा सणाच्या हंगामात मागणी कमी होणार
साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान सोन्याला मोठी मागणी असते. उत्सवाच्या हंगामात आगमन हे त्याचे कारण आहे. दिवाळीत सोन्याच्या किंमतीत वाढ होत असते. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याचा परिणाम थेट सोन्याच्या मागणीवर होतो. मुंबईच्या एका सोने विक्रेत्याने सांगितले की, या वेळी सणासुदीच्या काळात देखील किमती कमी राहतील, अशी अपेक्षा आहे. कारण किमतीमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.