‘सोनं-चांदी’ पुन्हा ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत आज तेजी आली. आज सोनं 150 रुपयांनी महागलं. दिल्लीत सोनं 42,270 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, देशातील इतर महानगरांचा विचार केला तर केडिया अ‍ॅडवायझरीनुसार आज दुपारी अहमदाबादमध्ये सोनं 42,350 रुपये प्रति 10 ग्रॅम, चेन्नईमध्ये 42,400 रुपये प्रति 10 ग्रॅम, मुंबईमध्ये 42,245 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि जयपूरमध्ये 42,235 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड करतहोते.

मंगळवारी चांदीच्या किंमतीत देखील तेजी आली. केडिया अ‍ॅडवायझरीनुसार मंगळवारी दिल्लीत चांदी 220 रुपयांनी महागली. त्यामुळे चांदी 47,820 रुपये प्रति किलोग्रॅम ट्रेंड करत होती. तर जयपूरमध्ये चांदी 47,810 रुपये, मुंबईत 47,830 रुपये, कोलकत्तामध्ये 47,890 रुपये आणि अहमदाबादमध्ये 47,825 रुपये प्रति किलोग्रॅम ट्रेंड करत होते.

वायदे बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी आली. एमसीएक्स एक्सचेंजवर मंगळवारी दुपारी एप्रिल 2020 ला सोन्याच्या वायदा भाव 267 रुपयांनी तेजीमुळे 41,023 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड होत होता. याशिवाय पाच जून 2020 ला सोन्याचा वायदा भाव 41,199 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि 5 ऑगस्टला सोनं 41,094 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड करत होते.

वायदे बाजारात चांदी एमसीएक्स एक्सचेंजवर 5 मार्च 2020 मध्ये चांदी वायदा मंगळवारी दुपारी 344 रुपयांच्या तेजीने 46,467 रुपये प्रति किलोग्रॅम ट्रेंड होत होती. याशिवाय 5 मे 2020 मध्ये वायदा भाव 46,983 रुपये प्रति किलो ग्रॅम आणि 3 जुलै 2020 वायदा भाव 47,143 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड होत होता.