Gold Price Today : सोन्याच्या किमतीमध्ये मोठी ‘वाढ’, चांदीत सुद्धा जबरदस्त ‘तेजी’, जाणून घ्या भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्थानिक सराफा बाजारात शुक्रवारी सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ नोंदली गेली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शुक्रवारी सोन्याच्या भावात 687 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी आली आहे. या तेजीमुळे दिल्लीत सोन्याचा भाव 54,538 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सिक्युरिटीजनुसार, जागतिक बाजारात किमतीमधील वाढीमुळे स्थानिक पातळीवर सोन्याच्या भावात ही तेजी पहायला मिळाली. मागील सत्रात गुरूवारी सोने 53,851रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

तर, चांदीच्या स्थानिक किंमतीमध्ये शुक्रवारी जबरदस्त वाढ नोंदली गेली आहे. चांदीत शुक्रवारी 2,854 रुपये प्रति किलोग्रॅमची तेजी आली आहे. या वाढीमुळे चांदीचा भाव 65,910 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. चांदी गुरुवारी 63,056 रुपये प्रति किलोग्रॅमच्या भावावर बंद झाली होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्यानुसार, दिल्लीत शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याच्या स्थानिक भावात सुद्धा 687 रुपयांची वाढ झाली. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोने शुक्रवारी वाढीसह 1,976 डॉलर प्रति औंसवर आणि चांदी 24 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसली.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी यांनी सांगितले की, कमजोर डॉलर आणि कोरोना व्हायरस प्रकरणे वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या चिंतेमुळे गुंतवणुकदार सेफ हेवन समजल्या जाणार्‍या सोन्याकडे वेगाने वळत आहेत, ज्यामुळे या किमती धातूमध्ये तेजी येत आहे. ते म्हणाले, अमेरिकेत कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत असल्याने आर्थिक रिकव्हरी होण्याची आशा कमी झाली आहे. याचा थेट परिणाम सोन्यामध्ये गुंतवणूक वाढण्यात दिसत आहे.