Gold Rate Today : आज पुन्हा एकदा सोनं महागलं तर चांदीचे भावदेखील ‘कडाडले’ ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सोन्या चांदीच्या किंमतीत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (सोमवार दि 14 सप्टेंबर) तेजी दिसून आली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढून 51,532 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीच्या भावातही 0.6 टक्क्यांनी वाढ होऊन चांदीचे दर 68,350 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

गेल्या सत्रात गोल्ड फ्युचरला 1 टक्क्यांनी किंवा 500 रुपयांनी खाली आलं होतं. तर चांदीचा दर 1.5 टक्के किंवा 1050 रुपये प्रतिकिलोनं कमी झाला होता. गेल्या महिन्यात 56200 विक्रमी उच्चांक असलेल्या सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम 5000 रुपयांची घट झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात आज फारसे चढउतार आलेले नव्हते. स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 1941.11 डॉलर होते. त्याच वेळी इतर मौल्यवान धातू, चांदीचे भाव गडगडले. चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 26.68 डॉलर प्रति औंसवर आली. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक धोरणांच्या निर्णयापूर्वी या शनिवार व रविवारच्या आधी सोन्याचे गुंतवणूकदार सावध होते. 15 ते 16 सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या दोन दिवसीय धोरण बैठकीवर सोन्याचे व्यापारी लक्ष केंद्रीत करतील.

यावर्षी सोनं 30 टक्के अधिक महागलं

यावर्षी सोन्याची किंमत पाहिल्यास, अलीकडच्या काळात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी आतापर्यंत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भविष्यातील बाजाराबद्दल बोलायचं झालं तर सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम सुमारे 51000 रुपये आहे. गेल्या महिन्यात ते प्रति दहा ग्रॅम 56000 रुपयांवर पोहोचले.