‘वायदे’ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात ‘वाढ’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बुधवारी सायंकाळी सोन्याच्या वायद्याच्या किंमतीत तेजी दिसून आली. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी सोन्याचे वायदाचे दर १.९६ टक्क्यांनी म्हणजेच ११८ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ४२,१९० रुपये झाले. त्याचवेळी ५ जून २०२० रोजी सोन्याचे वायदा मूल्य १.५३ टक्क्यांनी म्हणजेच ६४५ रुपयांच्या वाढीसह सध्या प्रति १० ग्रॅम ४२,७५० रुपयांवर आहे.

बुधवारपासून कोरोना विषाणूमुळे देशात २१ दिवसांचे संपूर्ण लॉकडाउन सुरू झाले आहे. या लॉकडाऊनचा थेट औद्योगिक आणि व्यावसायिक कामांवर परिणाम झाला आहे. बुधवारी देशभरात बंद असल्यामुळे सोन्याच्या बाजारपेठा बंद आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली. स्पॉट बुलियन मार्केट्स या आठवड्यात एक दिवसदेखील उघडू शकले नाहीत. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सोने आणि चांदी दोन्ही स्थिर दिसून आले. बुधवारी जागतिक पातळीवर सोने प्रति औंस १,६०० डॉलर्स आणि चांदी १४.२८ डॉलर प्रति औंस होते.

वायदा मार्केटमधील चांदीच्या किंमतींबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी संध्याकाळी त्यातही किंचित वाढ दिसून आली. एमसीएक्सवर ५ मे २०२० चा चांदीचा वायदा बुधवारी सायंकाळी ०.१३ टक्क्यांनी म्हणजेच ५१ रुपयांनी वाढून ४०,५७५ रुपये प्रतिकिलो राहिला.