अबब ! अचानकपणे सोन्याचा भाव ९३० रूपयांनी वाढला तर चांदी देखील महागली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याचे भाव आज वधारले आहेत. गुरुवारी म्हणजेच आज सोन्याच्या किंमती ९३० रुपयांनी वाढल्या आहेत. या किंमती वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती ३५,८०० रुपये प्रति १० ग्रॅम वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारल्याने सोन्याच्या भावात वाढ झाले आहेत. एवढेच नाही तर चांदीचे भाव देखील वधारले आहेत. चांदीच्या भावात आज ३०० रुपयांनी वाढ झाली त्यामुळे चांदीचा भाव ३९,२०० रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढल्याने ते १,४२०.८० डॉलर प्रति औंस आहे. तर चांदीची किंमत न्युयॉर्कमध्ये १५.२४ डॉलर प्रति औंस झाले आहेत.

ऑल इंडिया सराफ एसोसिएशन नुसार, राष्ट्रीय राजधानी म्हणजेच दिल्ली ९९.९९ टक्के शुद्ध सोने ९३० रुपयांनी वाढून ३५,८०० प्रति १० ग्रॅम झाले आहे. त्याबरोबरच ९९.५ टक्के शुद्ध सोने ९३० रुपयांनी वाढले आहे. याचा भाव ३५,६३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

चांदीचे भाव ३०० रुपयांनी वाढले आहे. तर चांदी ३९,२०० रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. साप्ताहिक आधारीत चांदीत ३५६ रुपयांनी भाव वाढला आहे. त्यांची प्रति किलोग्रॅम भाव ३८,३५६ रुपये झाला आहे. तर चांदींच्या शिक्यांची किंमत ८१,००० रुपये शेकडा झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like