Gold Rate Today | तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साधारण तुळशी विवाहानंतर लग्नाचा शुभमुर्हूतांना सुरुवात होते. या दरम्यान ग्राहकांची सोने-चांदीच्या (Gold Rate Today) खरेदीसाठी लगबग सुरु होते. मात्र तुम्ही जर आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला नाही. कारण जागतिक बाजारपेठेत (Global Market) सोन्याचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले की त्याचा परिणाम भारतीय बाजार (Indian Market) पेठेवर देखील होतो. त्यामुळे आज सोने-चांदी (Gold Rate Today) खरेदी करणे महाग पडू शकतं.

आज बुलियन्सच्या वेबसाईट नुसार, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढले (Gold Rate Today) आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 720 रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा दर 61 हजार 630 रुपये आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई – 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,720 तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,410. 1 किलो चांदीचा दर – 61,630

पुणे – 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,720 तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,410. 1 किलो चांदीचा दर – 61,630

नाशिक – 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,720 तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,410. 1 किलो चांदीचा दर – 61,630

नागपूर – 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,740 तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,428. 1 किलो चांदीचा दर – 61,690

दिल्ली – 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,660 तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,355. 1 किलो चांदीचा दर – 61,580

कोलकत्ता – 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 51,680 तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 47,373. 1 किलो चांदीचा दर – 61,610

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title :-  Gold Rate Today | gold rate today gold and silver price in on 10th november 2022 gold and silver rate slightly hike today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update