×
Homeआर्थिकGold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक...

Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जानेवारी ते जून या कालावधीत लग्नाचे मुहूर्त असल्याने सोन्याची मागणी जास्त असते. अशा परिस्थितीत सोन्याने (Gold Rate Today) आज नवा उच्चांक गाठला आहे. नोटबंदी आणि कोरोना काळातही सोन्याचे दर (Gold Rate Today) एवढे वाढले नव्हते. तेव्हाचा रेकॉर्ड आज सोन्याने मोडला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजार 490 रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदीचा दर 69 हजार 810 रुपये प्रती किलो आहे. GST आणि RTGS च्या किंमती पकडून शुद्धतेच्या सोन्याची किंमत 57 हजार 800 रुपयांवर पोहोचली आहे.

जागतिक बाजारातील डॉलरच्या संख्येत झालेली वाढ आणि आर्थिक मंदीचे सावट या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतीय बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) वाढ झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत आजचे दर काहीसे स्थिर आहेत.

सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव (Gold Rate Today) 0.30 टक्क्यांनी वधारला आहे. तर चांदीच्या दरात आज 0.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वायदा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव 173 रुपयांनी वधारुन 56 हजार 490 रुपये झाले आहेत. तर चांदीच्या दरातही 496 रुपयांनी वाढ झाली असून चांदीचा दर 69 हजार 810 रुपये प्रती किलो झाला आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर

शहर                        सोने                 1 किलो चांदीचा दर
मुंबई                   51,783                  69,810
पुणे                    51,783                  69,810
नाशिक                51,783                  69,810
नागपूर                51,783                  69,810
दिल्ली                 51,700                  69,690
कोलकाता             51,718                  69,720

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे
माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title :- Gold Rate Today | gold rate today gold and silver price in on 16th january 2023 gold and silver rate slightly hike today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘तर मिठी नदीत प्रेतं तरंगताना दिसली असती..,’ मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर संजय राऊत यांचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल

Hardeek Joshi | राणादाने सांगितलं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यामागचे कारण; म्हणाला…

Pune Crime News | तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला रिक्षाचालकावर कोयत्याने वार; लोहियानगरमधील घटनेत तिघांना अटक

 

Must Read
Related News