Gold Rate Today | दहीहंडीच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या तुमच्या शहरातील Gold चे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Rate Today | आज संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव (Dahi Handi-2022) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सण उत्सव म्हटलं की दागिने (Jewelry) खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे ग्राहकांना आज सोने-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईट नुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.35 टक्क्यांनी घसरुन 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 520 रुपये आहे. तर 1 किलो चांदीचा दर 56 हजार 120 रुपयांवर व्यवहार करत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे दर (Gold Rate Today).

 

आजचे सोन्या चांदीचे दर (Gold Rate Today)

शहर सोने चांदी (प्रति किलो)
मुंबई – 47,227 – 56,120
पुणे – 47,227 – 56,120
नाशिक – 47,227 – 56,120
नागपूर – 47,227 – 56,120
दिल्ली – 47,172 – 56,010
कोलकत्ता – 47,190 – 56,040

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

या ठिकाणी करा तक्रार

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप तयार केले आहे. BIS Care APP द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे केवळ सोन्याची शुद्धता नाही तर त्याबाबत कोणतीही तक्रार करु शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्यासंदर्भात तात्काळ तक्रार करु शकतात.

 

Web Title : –  Gold Rate Today | gold rate today gold and silver price in on 19th august 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा