Gold Rate Today । 9,000 रुपयांनी स्वस्त झालेल्या सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Rate Today । मागील काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold-silver rates) चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाले आहे. मात्र, आता सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे. आज प्रति 10 ग्रॅम 320 रुपयांची सोन्याच्या दरात (Gold Rate) वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Rate) 46,000 रुपये इतकी आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी जवळपास 47,000 हजार रूपये पर्यंत पोहचलं आहे.

सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Rate) वाढ झाली असली तरी ग्राहकांची मागणी देखील तितकीच आहे. त्यात काही बदल दिसून येत नाही. विशेष म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56, 200 रूपयांवर पोहचला होता. आता सोन्याची किंमत 9,000 रूपयांनी घसरले. म्हणून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, 320 रुपयांनी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव दर 60,000 रूपयांवर पोहोचतील असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

शहरांमधील सोन्याचा भाव –

मुंबई :
22 कॅरेट – 46,750 रुपये
24 कॅरेट – 47, 750 रुपये

चेन्नई :
22 कॅरेट – 45, 200 रुपये
24 कॅरेट – 49, 310 रुपये

दिल्ली :
22 कॅरेट – 46, 550 रुपये
24 कॅरेट – 50, 550 रुपये

कोलकाता :
22 कॅरेट – 47, 500 रुपये
24 कॅरेट – 49, 750 रुपये

शहरांमधील चांदीचा भाव –

मुंबई – 69, 600 रुपये
चेन्नई – 74, 100 रुपये
दिल्ली – 69, 600 रुपये
कोलकाता – 69, 600 रुपये

हे देखील वाचा

Anil Deshmukh | बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे वसुलीची रक्कम देशमुखांच्या PA ला दयायचा; ईडीचा दावा

Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच मोठी खळबळ ! केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा राजीनामा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Rate Today | gold rate today, know about rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update