Homeआर्थिकGold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे 10...

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Rate Today | लवकरच गणपतीचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी बाजारात सोने खरेदीसाठी लगबग सुरु आहे. सणउत्सावात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने (Gold and Silver Jewellery) खरेदी केले जातात. अशातच आज (गुरुवार) सोन्याच्या दरात (Gold Rate Today) कोणताही बदल झाला नसून चांदीच्या दरात थोडीशी घट झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स (Good Returns) या वेबसाईटनुसार चांदीचे दर 20 पैशांनी पडले आहेत. चांदी 57 हजार 600 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे.

 

गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate Today) प्रति 10 ग्रॅम 47,900 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 47,930 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,280 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,930 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,280 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,930 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,280 रुपये आहे. आजचा प्रति 10 ग्रॅमचा दर 576 रुपये आहे.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

Web Title : – Gold Rate Today | gold silver price on 18 august 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News