Gold Rate : सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – सातत्याने सोन्याचे घसरत असलेले दर सामान्यांना दिलासा देणारे होते. विवाहेच्छुक असणाऱ्या काहींना आणखी दर कमी होतील अशी आशा होती. आज या साऱ्यांसाठी काहीशी वाईट बातमी आहे. सोन्याच्या दरात आज वाढ नोंदविली गेली आहे. एप्रिल डिलिव्हरीच्य़ा सोन्याच्या दरात २४८ रुपयांची वाढ झाली आहे. हे सोने ४९३०० रुपयांवर ट्रेंड करत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात धातूंच्या किंमती वाढल्याने स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत १९८ रुपयांची वाढ झाली. यामुळे सोने ४८,४८०रुपये प्रति दहा ग्रॅमवर होते. एचडीएफसी सिकयुरिटीजने ही माहिती दिली आहे. सोमवारी सोन्यचा भाव ४८,२८२ रुपये प्रति दहा ग्रॅम होता. चांदीमध्येही मंगळवारी १,००८ रुपयांची प्रतिकिलोमागे वाढ झाली. चांदी मंगळवारी ६५,३४० रुपयांवर गेली होती.

आज चांदीच्या दरात ४७४ रुपये प्रति किलोमागे वाढ झाली आहे. यामुळे चांदी ६६५१० रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत होती. काल चांदी ६६०३६ रुपयांवर बंद झाली होती. आज बाजार उघडताना चांदीचा दर ६६१८१ रुपयांवर सुरु झाला होता. चांदीने ६६६४४ रुपये प्रति किलो एवढा उच्चतम दर गाठला होता. हे दर ५ मार्चच्या डिलिव्हरीचे आहेत.

एमसीएक्सवर फेब्रुवारी डिलीव्हरीचे सोने (Gold) बुधवारी ९४ रुपयांच्या वाढीनंतर ४९०७७ रुपये प्रति तोळा दरावर सुरु झाले. काल हेच सोने ४८९८३ रुपयांवर बंद झाले होते. सकाळी ११ वाजता सोन्याच्या दरात १४५ रुपयांची तर १ वाजता सोन्याच्या दरात २४३ रुपयांची वाढ पहायला मिळाली आहे. सध्या सोने ४९२२६ वर ट्रेंड करत आहे. दुपारी सोन्याने 49077 वरून ४९२४४ प्रति तोळा एवढी उंची गाठली होती. एप्रिल डिलिव्हरीच्य़ा सोन्याच्या दरात २४८ रुपयांची वाढ झाली आहे. हे सोने ४९३०० रुपयांवर ट्रेंड करत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात धातूंच्या किंमती वाढल्याने स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत १९८ रुपयांची वाढ झाली. यामुळे सोने ४८,४८० रुपये प्रति दहा ग्रॅमवर होते. एचडीएफसी सिकयुरिटीजने ही माहिती दिली आहे. सोमवारी सोन्यचा भाव 48,282 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. चांदीमध्येही मंगळवारी १,२२८ रुपयांची प्रतिकिलोमागे वाढ झाली. चांदी मंगळवारी ६५,३४० रुपयांवर गेली होती.

सोन्याचे दर ८००० रुपयांनी घसरले…

सोन्याच्या दरांमध्ये गेल्या पाच महिन्यांत मोठी घट दिसून आली आहे. पाच फेब्रुवारीच्या सोन्याच्या वायदा भावात सात गेल्या ऑगस्टला मोठी उच्चांकी वाढ पहायला मिळाली होती. या सत्रात फेब्रुवारी, २०२१ चा वायदा भाव ५७,१०० रुपयांवर बंद झाला होता. हा दर आताच्या दराशी पडताळला असता सध्याचा सोन्याचा दर त्या दराच्या तुलनेत ८,००० रुपयांनी कमी झाला आहे.

सोन्याचा भाव कसा ठरतो?

डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला होता. कोरोनाच्या अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला होता. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.