Gold Prices Today : सोनं खरेदी करण्याचं स्वप्न अपुर्णच राहू नये, सुमारे 8000 रूपयांपर्यंत घसरलाय सोन्याचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या लशीच्या बातम्यांमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये निरंतर घट झाली आहे. आतापर्यंत सोन्याच्या किमती जवळपास 8000 रुपयांनी कमी झाल्या आहेत. गेल्या एका आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमती 2.5 टक्क्यांनी आणि 3.5 टक्क्यांनी घसरल्या आहेत. सोने रेकॉर्ड (Gold Rate Today) पातळीपेक्षा सोन्याची किंमत 8,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचे दर 10 ग्रॅम 56191 रुपये होते, त्याच महिन्यात 25 ऑगस्ट रोजी सोने 48,500 रुपयांवर आले.

बाजार तज्ज्ञांच्या मते, आता सोन्या-चांदीच्या वाढीचा अंदाज आहे. कोरोना लशीवरील प्रारंभिक यशामुळे सोन्यातील कल कमी झाला आहे आणि जागतिक इक्विटी बाजारात गुंतवणूक वाढली आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेतही राजकीय अनिश्चितता बदलली आहे. म्हणून, जागतिक वाढीच्या पुनप्राप्तीच्या आशेमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे.

पूर्वी कोरोना महामारी आणि सणांमुळे सोनं खूप महाग झालं होतं. पण उत्सवाचा हंगाम संपताच यामध्ये घट झालेली पाहायला मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून ही घसरण सुरूच आहे. बुधवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,513 रुपये होते. त्याचबरोबर गुरुवारी आणखी घट नोंदविण्यात आली. गुरुवारी सोने स्वस्त झाले. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याच्या किमती 248 आणि चांदी 853 रुपयांनी घसरल्या.

गुरुवारी सोन्याचे UGold Prices Today) 248 रुपयांनी घसरून 49,714 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 853 रुपयांनी घसरून 61,184 रुपये प्रतिकिलो झाली. मागील सत्रातील व्यापारात त्याचवेळी त्यांचे भाव अनुक्रमे, 49,962 रुपये आणि प्रति10 ग्रॅम 62,037 रुपये होते. दिल्लीशिवाय इतर मेट्रो शहरांमध्येही सोन्याच्या किमती खाली आल्या आहेत. बंगळुरूमध्ये सोन्याचे भाव 46200 रुपये, चेन्नईमध्ये 46400 रुपये, कोलकातामध्ये 50070 रुपये आणि मुंबईत 49800 रुपये प्रतिदहा ग्रॅम आहेत.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, कोविड 19 च्या नवीन लशीच्या विकासासारख्या धोकादायक नवीन क्षेत्रांकडे गुंतवणूकदारांकडून बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.

You might also like