Gold Rate Today । सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) Gold Rate Today । बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold-silver) किंमतीत वारंवार चढउतार होत असते. सोन्याच्या किंमतीत आज (गुरुवारी) पुन्हा एकदा घट झाली आहे. एमसीएक्सनुसार सकाळी 122 रुपयांच्या घसरणीसह सुरुवात झाली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे दर 182 रुपयांच्या घसरणीसह अर्थात 0.39 टक्क्यांच्या घसरणीसह 46,890 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने सोन्याची किंमत झाली आहे. gold rate today latest rate gold and silver 24 june 2021, know about it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

या दरम्यान, सोन्याचा भाव सकाळच्या सत्रामध्ये 46,950 रुपयांच्या उच्चांकावर आणि किमान 46,811 रुपयांवर पोहोचला होता. याचबरोबर तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही घसरण होताना दिसत आहे. तर, जुलै डिलिव्हरीची चांदी सकाळी 11 वाजता 364 रुपयांनी घसरून 67,568 रुपये प्रति किलोवर आली होती. तसेच, सोन्याच्या किंमतीत बुधवारीही तेजी दिसून आली होती. दिल्ली सराफा मार्केटमध्ये बुधवारी सोने 110 रुपयांनी महाग होऊन 46,396 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. याअगोदर सत्रात सोन्याची किंमत 46,286 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती.

का झाली दरात घसरण –
अमेरिकन फेडरल रिझर्वने (US Fed Reserve) 2023 मध्ये दोन वेळा व्याजदर वाढविण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर जगातील दुसऱ्या मुख्य करंसीजच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. यामुळेच मागील आठवड्यामध्ये सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. अमेरिकन इकॉनमीच्या तुलनेत फेडरल रिझर्वचा आशावादी दृष्टीकोन बॉन्ड यील्डमध्ये मोठी तेजी दिसून आलीय.

या दरम्यान कमोडिटी एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, आगामी 3-4 दिवसांसाठी सोन्याची किंमत कमी होऊ शकते. आणखी स्वस्त होऊन सोने 45,500 रुपयांपर्यंत घसरू शकते. परंतु, पिवळ्या धातूची घसरण तात्पुरती आहे. म्हणून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी किंमतीत घसरण झाल्याचा फायदा घ्यायला हवा. तसेच, सोन्याच्या किंमती पुन्हा वाढतील आणि आगामी एक महिन्यात हे दर 48 हजार 500 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Web Title :-  gold rate today latest rate gold and silver 24 june 2021, know about it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव