Gold-Silver Price : आठवडयाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घट, किंमतीत झाली 5521 रूपयांची घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सोमवारी एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. आजच्या सुरुवातीच्या व्यापारात एमसीएक्सवर डिसेंबर डिलीव्हरीसाठीचे सोन्याचे दर 0.3 % टक्क्यांनी घसरून 50679 प्रति 10 ग्रॅमवर आला, तर चांदीचा वायदा 1.12 % घसरून 61,749 रुपये प्रति किलोवर पोहोचला. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 56,200 च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचल्यापासून सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. आतापर्यंत स्थानिक बाजारात प्रति दहा ग्रॅम 5521 रुपयांची घसरण झाली आहे. मागील सत्रात सोन्याच्या किमतीत 0.2 टक्के वाढ झाली होती तर चांदीमध्ये 0.3 टक्क्यांनी घसरण झाली.

शुक्रवारी स्वस्त झाले सोने –

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये शुक्रवारी सोने स्वस्त झाले. तर चांदीचे दर वाढले. शुक्रवारी सोन्याच्या किंमती 75 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 51,069 रुपयांवर आल्या. त्याचबरोबर चांदीचा दर 121 रुपयांनी वाढून 62,933 रुपये प्रति किलो झाला. याआधी गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 51,144 रुपयांवर बंद झाले होते. गुरुवारी चांदीचा भाव 62,812 रुपये प्रतिकिलो होता.

परदेशी बाजारात आज घसरल्या किंमती –

परदेशी बाजारात सोन्याचे दर आज एक आठवड्याच्या नीचांकावर खाली आले. यूएस मध्ये प्रोत्साहन पॅकेजसंदर्भातील घोषणेमुळे डॉलर मजबूत झाला. मात्र, अमेरिकेत कोरोना विषाणूची नोंद झाली असल्याने सोन्यात मोठी घसरण झाली नाही. परदेशी बाजारात आज स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून 1,899.41 डॉलर प्रति औंस झाला. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 24.45 डॉलर प्रति औंसवर, तर प्लॅटिनम 0.7 टक्क्यांनी घसरून 895 डॉलर झाले. व्यावसायिकांना आशा आहे की, अमेरिकेतील कोरोना व्हायरस राहत पॅकेजवर लवकरच चर्चा होईल असे वाटत नाही.

आता पुढे काय होईल –

अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी म्हणाल्या की, 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आणखी एक कोरोना व्हायरस आर्थिक पॅकेज देणार आहे. दरम्यान, एसपीडीआर गोल्ड ट्रस्टचा जगातील सर्वात मोठा गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा गोल्ड ईटीएफमध्ये होल्डिंग शुक्रवारी 0.14 टक्क्यांनी घसरून 1,263.80 टनावर गेला. अमेरिकेतील मदत पॅकेजविषयी अनिश्चितता, डॉलरची वाढ आणि या उत्सवाच्या हंगामातही दागिन्यांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा नाही. दरम्यान चीननंतर भारतात सोन्याचा वापर सर्वाधिक आहे.