सोन्या-चांदीच्या दरात ‘सुपरफास्ट’ तेजी ! Gold 7 वर्षातील ‘उच्चांका’वर तर Sliver 80 हजार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात आज सर्वात उच्च किंमतीला सोन्याची विक्री होत आहे. तर चांदीच्या दरांनी देखील 75 हजारांचा टप्पा पार केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींनी उसळी घेतल्यानंतर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्यावर झाला आहे. जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जस जसा वाढत आहे. तस तसे सोन्या आणि चांदीच्या किमती नव्या रेकॉर्ड स्तरावर जात आहेत. MCX वर सोन्याचा दर 56 हजाराच्या पुढे गेला आहे. तर चांदी 79 हजाराच्या पुढे जात 80 हजाराच्या जवळ पोहचली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने दोन हजार डॉलरच्या पार जात 2 हजार 58 डॉलरवर पोहचले. हा गेल्या 7 वर्षातील सर्वोच्च दर आहे. 31 जुलै रोजी सोन्याचा दर 1973 डॉलवर बंद झाला होता. ऑगस्ट महिन्यात तो 2072 डॉलर या सर्वोच्च स्तरावर गेला होता. चांदीचा दर गुरुवारी 28.40 डॉलरवर गेला होता. MCX वर सकाळी 10.40 वाजता ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या किमतीत 15 रुपयांची घसरण झाली होती. सध्या तो 55 हजार 830 वर ट्रेड करत आहे. गुरुवारी सोन्याचा दर 55 हजार 845 रुपयांवर बंद झाला. आज सकाळी तो 55 हजार 965 वर सुरु झाला 56 हजार 191 हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे.

डिसेंबर मध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या दरात MCX वर 15 रुपयांची तेजी दिसत होती. तो 56 हजार 30 रुपयांवर ट्रेड करत आहे. गुरुवारी तो 56 हजार 015 च्या स्तरावर बंद झाला होता. आज सकाळी तो 56 हजार 347 वर सुरु झाला.

MCX वर सकाळी सप्टेंबर महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या किंमतीत 98 रुपयांची तेजी होती. तो सध्या 75 हजार 150 वर ट्रेड करत आहे. गुरुवारी चांदीचा दर 76 हजार 50 रुपयांवर बंद झाला होता. आज सकाळी बाजार सुरु होताच हा दर 77 हजार 949 वर सुरु झाला. MCX वर डिसेंबरमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या किमती 106 रुपयांनी वाढल्या होत्या.

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत 225 रुपयांची तेजी येत तो 56 हजार 590 रुपयांवर पोहोचला होता. तर चांदी 1 हजार 932 रुपयांच्या तेजीसह 75 हजार 755 रुपयांच्या स्तरावर पोहोचला. बुधवारी सोने 10 ग्रॅमसाठी 56 हजार 365 वर बंद झाला. तर चांदीचा भाव 73 हजार 823 प्रती किलोवर बंद झाला होता.