Gold Rate Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी घसरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ (Gold Rate Today) झाली की त्याचे परिणाम भारतीय बाजारपेठेवर ही दिसू लागतात. भारतीय सराफा बाजारात आज सोने-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. सोने-चांदीच्या दरात (Gold Rate Today) आज पुन्हा मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

 

मागील दोन दिवसांत सोन्याच्या भावात झालेल्या या मोठ्या घसरणीनंतर आता गुड रिटर्न्स नुसार (Good Returns) गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी (दि.2) सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 500 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate Today) सराफा बाजारात 51,270 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला आहे.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

या ठिकाणी करा तक्रार

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप तयार केले आहे. BIS Care APP द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे केवळ सोन्याची शुद्धता नाही तर त्याबाबत कोणतीही तक्रार करु शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्यासंदर्भात तात्काळ तक्रार करु शकतात.

 

Web Title : –  Gold Rate Today | today gold silver rate 2 sep maharashtra india

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा