Gold Rate : सोनं-चांदी झालं 1277 रूपयांपर्यंत स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण आली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोने 121 रुपये स्वस्त झाले. तर या दरम्यान चांदीच्या किंमतीत 1277 रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण झाली आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, परदेशी बाजारात सोन्याचे भाव एक महिन्याच्या खालच्या स्तरावर आले आहेत. कोरोनाची प्रकरणे पुन्हा फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेत वाढल्याने चिंता वाढली आहे. याच कारणामुळे बुधवारी डॉलर एक महिन्याच्या उच्च स्तरावर पोहचला. याच कारणांमुळे सोन्याच्या किमतीने घसरणीचे वळण घेतले आहे. पुढील आठवड्यात सुद्धा किमतीवर दबाव राहाण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या नव्या किमती
गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 121 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरला आहे. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आता 50,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यापूर्वी व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा दर 50,751 रुपयांवर बंद झाला होता. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1878 डॉलर प्रति औंस होता. गोल्डमध्ये 2 टक्के घसरण आली. यूएस गोल्ड फ्यूचर्सशिवाय बदलामुळे 1,879.60 डॉलर प्रति औंस होता. चांदीचा भाव 0.1 टक्केच्या थोड्या तेजीने 23.43 डॉलर प्रति औंस होता.

चांदीच्या नव्या किमती
चांदीबाबत बोलायचे तर आज यामध्ये मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात चांदी 1,277 रुपये प्रति किलोग्रॅम स्वस्त झाली. तिचा दर 60,098 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला आहे. यापूर्वी व्यवहाराच्या दिवशी म्हणजे बुधवारी चांदीची किमत 60,098 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

दिवाळीला मिळेल मोठ्या कमाईची संधी
पुढील महिन्यात त्या लोकांकडे सोन्यातून दुप्पट पैसे करण्याची संधी आहे, ज्यांनी सॉवरेन गोल्ड बॉन्ड्समध्ये सर्वप्रथम गुंतवणूक केली होती. कारण, नोव्हेंबर 2015 मध्ये लाँच झालेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या प्रीमॅच्युअर रिडेम्प्शनचा कालावधी नोव्हेंबर 2020 मध्ये पूर्ण होईल. त्यादरम्यान गोल्ड बाँडचा भाव 2,683 रुपये प्रति ग्रॅम होता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सध्या सोन्याचा भाव 5,135 रुपये प्रति ग्रॅम आहे. यामुळे अगोदर गोल्ड बाँडची 5 वर्ष पूर्ण होतील, अशावेळी फिजिकल फॉर्म किंवा ऑनलाइन गोल्ड बाँड खरेदी करणारे गुंतवणुकदार यास रीडीम करू शकतात.

मागील 5 वर्षात किती झाला फायदा?
गोल्ड रीडीम केल्यावर सोन्याचा भाव आयबीजेएद्वारे करण्यात आलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या आधारावर असेल. सध्याच्या किंमतीबाबत बोलायचे तर ज्यांनी यामध्ये सर्वप्रथम गुंतवणूक केली होती, त्यांना सुमारे 90 टक्केचा फायदा मिळेल. सोबतच, मागील 5 वर्षात त्यांना प्रत्येक वर्षी सुमारे 14 टक्केचा लाभ झाला आहे.

You might also like