Gold Rate Weekly Review : जाणून घ्या मागच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात किती झाला ‘चढ-उतार’

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात सेफ असेट समजल्या जाणार्‍या सोन्यात गुंतवणूक वाढत आहे आणि याच कारणामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे चांदीसुद्धा याबाबतीत मागे नाही. मागच्या आठवड्यात चांदीची चमक खुपच वाढली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) च्या वेबसाइटवर उपलब्ध रेट्सनुसार शुक्रवारी संपलेल्या व्यवसायिक आठवड्यात 999 शुद्धता असलेल्या म्हणजे 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅमवर एकुण 961 रुपयांची वाढ नोंदली गेली आहे. तर, आठवड्यात चांदीच्या किमतीत एकुण 1,720 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ झाली.

6 जुलै, 2020

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 6 जुलै, 2020 म्हणजे सोमवारी सराफा बाजार बंद होताना 999 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 48,359 रुपये प्रति दहा ग्रॅमवर होता. तर, चांदीची किंमत 49,255 रुपये प्रति किलोग्रॅमवर राहिली होती.

7 जुलै, 2020

आयबीजेएच्या रेट्सनुसार सात जुलै, 2020 ला सोन्याचा भाव 85 रुपयांच्या मोठ्या तेजीसह 48,444 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचला. दुसरीकडे चांदीची किंमत 385 रुपयांच्या घसरणीसह 48,870 रुपये प्रति किलोग्रॅमवर राहिली.

8 जुलै, 2020

अशाप्रकारे, आठ जुलै, 2020 ला 24 कॅरेट सोन्याची किंमत 678 रुपयांच्या मोठ्या उसळीसह 49,122 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचली. तर, चांदीसुद्धा 1,270 रुपयांच्या तेजीसह 50,140 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर पोहचली.

9 जुलै, 2020

नऊ जुलैरोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 117 रुपयांच्या तेजीसह 49,239 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचला. तर, एक किलोग्रॅम चांदीची किंमत 1,080 रुपयांच्या मोठ्या तेजीसह 51,220 रुपयांच्या स्तरावर पोहचली.

10 जुलै, 2020

आठवड्याच्या शेवटच्या व्यवसायिक सत्रात सोन्याचा दर 81 रुपयांच्या तेजीसह 49,320 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचला. तर, चांदी 245 रुपयांच्या कमीसह 50,975 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर आली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like