खुशखबर ! मोदी सरकार विकतंय बाजार भावापेक्षा कमी दरात सोनं, 6 मार्चपर्यंत खरेदी करण्याची ‘संधी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वस्त सोनं खरेदी करण्याची सरकार तुम्हाला संधी उपलब्ध करुन देत आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या नव्या विक्रीला 2 मार्च 2020 म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. यात तुम्ही 6 मार्च 2020 पर्यंत गुंतवणूक करु शकतात. सोन्याच्या किंमतीने उच्चांकी गाठली असताना मोदी सरकारने सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2019 – 20 ची 10 वी सीरीज सादर केली आहे.

यंदा सॉवरेन गोल्डची इश्यू प्राइज 4,260 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. यावर गुंतवणूक केल्यास तुम्हाला व्याज देखील मिळू शकते. तसेच हे ऑनलाइन खरेदी केल्यास यावर तुम्हाला 50 रुपये सूट देखील मिळेल. गुंतवणूकदारांना 11 मार्च पर्यंत बॉन्ड मिळतील.

किती सोनं खरेदी करु शकतात –
सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षात जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोने खरेदी करता येते. तर कमी कमी 1 ग्रॅम. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचा टॅक्स देखील वाचेल. योजनेच्या गुंतवणूकीवर 2.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल.

काय आहे सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम –
या योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2015 साली झाली होती. या योजनेचा उद्देश आहे की, सोन्याच्या सराफ बाजारातून होणाऱ्या खरेदीला कमी करणे आणि सोन्याच्या खरेदीत उपयोग होणाऱ्या घरगुती बचतीचे वापर वित्तीय बचतीत करणं. घरात सोनं खरेदी करण्याऐवजी तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करु शकतात, यावर तुम्ही टॅक्स देखील वाचवू शकतात.

येथून खरेदी करा स्वस्त सोनं –
सॉवरेन गोल्ड बॉन्डची विक्री स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि शेड्यूल्ड कमर्शियल बँकांमध्ये तसेच काही पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात येते. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये या बॉन्डची खरेदी करता येते. भारत बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड कडून मागील 3 दिवस 99.9 टक्के शुद्ध सोन्याच्या दिलेल्या किंमतीवर देण्यात आलेल्या किंमतीच्या आधारे या बॉन्डची किंमत निश्चित केली जाते.

50 रुपये एक्स्ट्रा सूट –
भारत सरकारने आरबीआयच्या सल्ल्याने ऑनलाइन अर्ज केल्यास बॉन्डवर 50 रुपये प्रति ग्रॅमवर सूट मिळेल. म्हणजे 4,260 रुपये प्रति ग्रॅम असलेला सॉवरेन बॉन्ड तुम्हाला 50 रुपयांची सूट मिळून 4,210 रुपयांनी मिळेल.

कॅपिटल गेन टॅक्सची बचत –
बॉन्डची किंमती सोन्याच्या किंमतीच्या अस्थिरतेवर निर्भर असते. सोन्याच्या किंमती घट झाल्यास गोल्ड बॉन्ड नकारात्मक रिटर्न देतो. ही अस्थिरता कमी करण्यासाठी सरकार जास्त कालावधीचे बॉन्ड जारी करते. यात गुंतवणूकीचा कालावधी 8 वर्षांचा असतो, परंतु तुम्ही 5 वर्षानंतर तुमचे पैसे काढू शकतात. पाच वर्षांनंतर पैसे काढल्यास कॅपिटल गेन टॅक्स देखील लावला जाणार नाही.