Gold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर (Gold Rate ) वाढत होते. मात्र, आता जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate ) शनिवारी (दि. 23) घट झाली आहे. Good Returns या वेबसाइटच्या माहितीनुसार, देशात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 210 रुपयांची घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅममागे 48 हजार 340 रुपये इतका झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅममागे 48 हजार 550 रुपये इतका होता.

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 48, 340 रुपये इतका आहे. तर दिल्लीत 48, 100 रुपयांनी सोने खरेदी करता येणार आहे. पुणे आणि नाशिकमध्येही 48, हजार 340 रुपये इतका दर असल्याची माहिती good returns या वेबसाइटने दिली आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव काय?
24 कॅरेट सोन्याच्या किमतीतही घट झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 49, 340 रुपये मोजावे लागणार आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 210 रुपयांची घट झाली आहे.

गेल्या सहा दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक वातावरण आणि अमेरिकेतील सत्तांतरणामुळे सेन्सेक्सनेही भरारी घेतली होती. याचाच परिणाम सोन्याच्या दरावरही पाहायला मिळाला होता.