सोन्याचे आजचे दर ‘विक्रमी’ उच्चांकीवर, 1947 मध्ये मिळायचं आजच्या दूधाच्या भावामध्ये Gold !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी संपूर्ण भारताने 74 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला. कोरोनामुळे या वर्षात भारतात सर्वच गोष्टींमध्ये बदल झाला आहे. परंतु त्या काळात जे महत्त्व सोन्याला होते, ते आज देखील आहे. भारतातील लोकांकडून सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. राजकीय, आर्थिक संकटाच्या काळामध्ये सोन्याकडं एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. संकट काळात उपयोगी पडणाऱ्या सोन्यामध्ये भारतीय गुंतवणुकीसाठी सोन्याला पसंती देतात. मात्र सोन्याच्या बाबतीही एक गोष्ट आजही बदल्याचे आपल्या दिसून येते. ति म्हणजे सोन्याचे दर.

1947 या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीचा विचार केला तर आज सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळच्या सोन्याच्या किंमतीत आणि आजच्या किंमतीमध्ये तब्बल 600 पटींनी वाढ झाली आहे. सोन्याच्या 15 ऑगस्ट 1947 रोजी असणाऱ्या किंमतीची तुलना करायची झाली तर आज जेवढे पैसे तुम्हाला दीड लीटर दुधासाठी द्यावे लागतात. तेवढेच पैसे त्यावेळी सोने खरेदीसाठी द्यावे लागत होते. 1947 मध्ये सोन्याचा भाव प्रति तोळा 88.62 रुपये इतका होता. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

परंतु त्या काळाच्या दृष्टीने ही किंमत देखील जास्त होती. कारण 1947 मध्ये सामान्य माणसांचे वार्षिक उत्पन्न साधारण 250 रुपये इतके असायचे. आता उत्पन्नामध्ये जमिन आसमानाचा फरक पडला आहे.

सोन्याचे नवे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती उतल्या असल्या तरी देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. शुक्रवारी सोन्याचे दर 730 रुपये प्रति तोळा वाढले. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या अर्थात 24 कॅरेट सोन्याचे दर 52 हजार 961 रुपये प्रति तोळ्यावरून वाढून 53 हजार 691 रुपये प्रति तोळावर पोहचले आहेत. यावेळी सोन्याच्या किंमतीत 730 रुपयांची वाढ पहायला मिळाली. तर मुंबईत 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 52 हजार 956 रुपये प्रति तोळा आहे.