Gold Price Today : डॉलरमधील तेजीमुळं सोन्याचे दर उतरले, झालं स्वस्त, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सोन्याच्या वाढत्या किमतीचा आलेख शुक्रवारी काहीसा थांबलेला पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात दर उतरल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याचे भाव (Gold Price ) कमी झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालात (US Election Result) जो बायडन (Joe Biden) यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र बायडन यांच्या विजयाची अपेक्षा वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यामध्ये तेजी आली आहे. अशी अपेक्षा केली जात आहे की, डेमोक्रेट्सकडून रिपब्लिकनच्या तुलनेत अधिक विस्तृत आर्थिक पॅकेज दिले जाईल. त्यातच बायडन यांच्या विजयाच्या आशा अधिक वाढल्या आहे. त्यामुळे शेअर बाजारात तेजी आहे तर अमेरिकन डॉलरमध्ये घसरण झाली आहे. ज्याचा परिणाम बुलियन मार्केटवर झालेला दिसतो आहे.

सोन्याचे दर (Gold Price,)
दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी (दि. 5) सोन्याचे भाव 158 रुपयांनी वाढले होते. यानंतर नवे दर 50 हजार 980 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. बुधवारी सोन्याचे दर 50 हजार 822 रुपये प्रति तोळावर ट्रेड करणे बंद झाले होते.

चांदीचे दर (Silver Price)
सोन्याबरोबरच चांदीमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर 697 रुपयांनी वाढून 62 हजार 043 रुपये प्रति किलो झाले होते. एक दिवस आधी बाजार बंद होताना चांदी 61 हजार 346 रुपये प्रति किलो होती.

कोरोनाचे वाढते संक्रमण आणि अनिश्चिततेमुळे सोन्याचे भाव येणाऱ्या काळात वाढू शकतात. अशावेळी विविध केंद्रीय बँका भविष्याचा विचार करता अधिकाधिक सोने खरेदी करत आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि भारत-चीन सीमावाद यामुळे देखील आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेची स्थिती वाढत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन फेडरल रिझर्व्हने असे संकेत दिले आहेत की, व्याजदर 2023 पर्यंत शुन्याच्या आसपास असतील.