सोन्या-चांदीनं पुन्हा ‘खाल्ला’ भाव, 38470 प्रति तोळा, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासुन सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून आज (सोमवारी) सोन्याचे दर पुन्हा वाढले. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती ५० रुपयांनी वाढून त्या ३८,४७० प्रति तोळा इतक्या झाल्या. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढतच असल्याने आणि अमेरिका-चीन व्यापारी तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारातील सोन्याच्या किमती देखील वाढत आहेत.

का महागले सोने
बाजारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वाढत्या जागतिक मागणीसह स्थानिक पातळीवरील सराफांची मागणीही वाढल्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिका-चीनच्या व्यापारामध्ये वाढणारा तणाव देखील किमती कडाडण्याचे महत्त्वाचे कारण आहे. या तणावात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सराफा बाजाराकडे वळले. अमेरिकेने मागच्या आठवड्यात केलेल्या घोषणेप्रमाणे चीनमधून आयात केलेल्या ३०० अरब डॉलर मूल्याच्या साहित्यावर १ सप्टेंबर पासून अतिरिक्त शुल्क लावले जाणार आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लवकरात लवकर व्यापारी सामंजस्य करारानुसार निर्णय न घेतल्यास शुल्क आणखी वाढविले जाईल. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबाबत लवचिक धोरण ठेवणार नसल्याचे शुक्रवार पुन्हा जाहीर केले आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरल्याने देखील सोन्याचे भाव कडाडले आहेत.

सोन्या-चांदीचे नवीन भाव
देशाची राजधानी दिल्ली येथे ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असणाऱ्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५०-५० रुपयांनी वाढून अनुक्रमे ३७,४७० आणि ३८,३०० रुपये प्रती तोळ्यापर्यंत पोहोचला. गिन्नीचा भाव मात्र २८,६०० प्रति आठ ग्राम इतका झाला. त्याचबरोबर चांदीचेही भाव ११५० रुपयांनी वधारले असून ४३,००० प्रतिकिलो इतकी झाली आहे .

आरोग्यविषयक वृत्त