सोनं पुन्हा एकदा महागलं, चांदी देखील चकाकली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दागिण्यांची मागणी वाढल्याने सणासुदीच्या दिवसात सराफ बाजारात सोने तिसऱ्या आठवड्यात देखील महाग होताना दिसले. या दरम्यान सोने 50 रुपयांनी महाग होऊन 39,270 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदी देखील महागली आहे. चांदीचे भाव 425 रुपयांनी वाढून 46,750 रुपये प्रति किलोग्रॅम झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी –
अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापार युद्धावर तोडगा निघण्यावर होणार उशीर सोन्या-चांदीच्या किंमत वाढीला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये सोने 16.40 डॉलरने वाढून 1,504.60 डॉलर प्रति 10 ग्रॅम झाले. चांदी देखील 0.28 डॉलरने वाढून 17.53 डॉलर प्रति औंस झाली.

अंतर्गत बाजारात सोन्याच्या दरात तेजी
स्थानिक बाजारात शुक्रवारी सोडून बाकी चार दिवसात सोन्याचा भावात घसरणं पाहायला मिळाली. गांधी जयंती 2 ऑक्टोबरला बाजार बंद झाला. सोने स्टॅडर्डने 50 रुपयांनी वाढून दहा ग्रॅमवर पोहचले. सोन्याच्या बिटूरमध्ये तेजी येऊन आठवड्यात 39,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आठ ग्रॅम गिन्नीमध्ये 100 रुपयांनी घसरुन 30,200 रुपये इतकी झाली.

बाजारात तेजीचे परिणाम –
सणासुदीच्या दिवसात चांदी हाजिर 425 रुपयांनी वाढून 46,750 रुपये किलोग्रॅम झाली. चांदी वायदा मात्र 13 रुपयांनी वाढून 45,530 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. शिक्के लिलावी आणि बिकवाली आठवड्याच्या दरम्यान स्थिर राहिले आणि क्रमश 920 रुपये आणि 930 रुपये प्रति शेकडा राहिले. व्यापाऱ्यांनी सांगितले की सणासुदीच्या दिवसात मागणीत तेजी आली. तसेच जागतिक करारांचा देखील सोन्या चांदीच्या दरावर परिणाम होतो. एकूण मिळून याचा बाजाराच्या तेजीवर परिणाम होतो.

Visit : Policenama.com 

You might also like