यंदा धनतेरसला सोन्याची चमक फिकी पडणार, विक्रीत घट होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भावामुळे यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, यावर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होणार नाही. वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट कमी होणार आहे. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले कि, यावर्षी सोन्याच्या विक्रीच्या दरात 50 टक्क्यांनी घट होणार आहे.

अधिक बोलताना त्यांनी सांगितले कि, धनत्रयोदशीला जवळपास 40 टन सोन्याची विक्री होत असते. मात्र यावर्षी मागणी नसल्याने यामध्ये मोठ्या प्राणावर घट होणार आहे. आयात शुल्कमध्ये देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या वाढीमुळे देखील सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात केवळ 26 टन सोने आयात केले गेले असून मागील वर्षी 81 टन सोने आयात केले गेले होते. केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्याच्या आयात शुल्क 10 टक्क्यांवरून साडेबारा टक्के करण्यात आल्याने सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

दरम्यान, मेहता यांनी सांगितले कि, भारतात तीन प्रकारच्या काळात सोन्याची मागणी असते. लग्नाच्या वेळी, सणासुदीच्या काळात आणि रेग्युलर डिमांड, अशा तीन कार्यकाळात सोन्याला मागणी असते. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात देखील सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे मेहता यांनी सांगितले.

Visit : Policenama.com