Gold Scheme | उद्यापासून पाच दिवस स्वस्तात सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Scheme) करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे. सोमवार 9 ऑगस्टपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 (Sovereign Gold Bond Scheme 2021-22) ची पाचव्या सीरीजची (Series 5) विक्री सुरु होणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 मध्ये उद्यापासून पाच दिवस बाजारभावाहून कमी दरात सोने खरेदी करण्याची तुम्हाला संधी आहे.

सोन्याची विक्री 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. बॉन्डची इश्यू किंमत 4,790 रुपये प्रति ग्रॅम आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2021-22 ची पाचवी सीरीज सोमवारपासून पुढील पाच दिवसांसाठी सब्सक्रिप्शनसाठी (Subscription) खुली राहणार आहे. RBI नुसार, बॉन्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळणार आहे. म्हणजेच अशा गुंतवणुकदारांसाठी 1 ग्रॅम गोल्ड बॉन्डची किंमत 4,740 रुपये असणार आहे.

सॉव्हरेन गोल्ड म्हणजे काय ?
सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हा एक सरकारी बॉन्ड (Government bond) असतो.
ज्याला डिमॅट स्वरूपात परिवर्तित करता येते. त्याचं मुल्य रुपये किंवा डॉलरमध्ये नसतं तर सोन्याच्या वजनात असते. जर बॉन्ड पाच ग्रॅम सोन्याची जितकी किंमत असेल तेवढी किंमत या बॉन्डची असेल. सरकारकडून RBI च्या माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड जारी केले जाते. याची सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्ये झाली.

 

कुठे खरेदी करता येईल बॉन्ड ?

गोल्ड बॉन्डची विक्री बँक (Bank), स्टॉक होल्डिंग कॉरर्पोरेशन ऑफ इंडिया (Stock Holding Corporation of India),
पोस्ट ऑफिस (Post Office) आणि मान्यता प्राप्त शेअर बाजार NSE आणि BSE द्वारे करता येते.
सॉव्हरेन गोल्ड बॉन्डसाठी अर्ज करताना पॅन कार्ड गरजेचे आहे.
स्मॉल फायनान्स बँक (Small Finance Bank) आणि पेमेंट बँकमध्ये याची विक्री केली जात नाही.
या योनेमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब एका आर्थिक वर्षात कमीत कमी 1 ग्रॅम तर जास्तीत जास्त 4 किलोग्रॅम गोल्डसाठी गुंतवणूक करु शकतात.
ट्रस्ट सारख्या इतर संस्थांना 20 किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करता येते.

किंमत कशी ठरते ?
अर्थ मंत्रालाने दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड बॉन्डची किंमत ही
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडकडून (India Bullion and Jewelers Association Limited) जाहीर केली जाते.
ही किंमत सामान्य सरासरी किंमतीवर असते.
ही किंमत गुंतवणुकीच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन व्यावसायिक दिवसांमध्ये 99.9 शुद्धतेच्या सोन्याची सरासरी किंमत असते.

Web Title :- Gold Scheme | sovereign gold bond scheme 2021 22 series v opens for subscription from 9 august check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Phenofibric acid | ब्रिटिश संशोधकांचा दावा- कोलेस्ट्रॉलच्या औषधाने 70% पर्यंत कमी होऊ शकतो Corona व्हायरसचा धोका

Eknath Khadse | आठवडाभरापासून एकनाथ खडसे रुग्णालयात

Zika Virus | पुणे जिल्ह्यातील ‘झिका’ची अतिसंवेदनशील 79 गावांची जाहीर, वाचा लिस्ट