विमानतळावर कोट्यावधी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (बुधवार) मोठी करावाई करण्यात आली. या कारवाईत सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) ७ कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

दुबईहून आलेल्या प्रवाशाच्या हालचालीवर संशय आल्याने पथकाने प्रवाशाची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे ७ कोटींचे ४४ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आले.

आज केलेल्या कारवाई दरम्यान ५०० ग्राम वजनाची एकूण ४४ सोन्याची बिस्किटं एआययूने जप्त केली आहेत. या सोन्याच्या बिस्किटांची बाजारात ६ कोटी ७४ लाख ४८ हजार २६० इतकी किंमत आहे. या सोन्याच्या बिस्किटांचे वजन २२ किलो असून अटक आरोपीने सोन्याची तस्करी कोणासाठी केली होती याचा तपास एआययू करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या दिली.