सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही धातूंच्या दरात तेजी आली आहे. त्यामुळे दिल्ली सराफ बाजारत सोने 230 रुपयांना महागले, त्यामुळे सोन्याचे दर 39,370 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदी देखील 110 रुपयांनी महागली, त्यामुळे चांदीचे दर 46,750 रुपये प्रति किलोग्रॅम झाले.

परदेशात सोने हाजिर 1.70 डॉलरने वाढून 1,492.20 डॉलर प्रति औंसवर पोहचले. डिसेंबरमध्ये अमेरिकन सोने वायदा देखील 5.10 डॉलरने वाढून 1,493.80 डॉलर प्रति औंस झाले.

बाजार तज्ज्ञांच्या मते तांत्रिक कारणाने आज सोन्यात थोडी वाढ पाहायला मिळाली. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध यामुळे सोन्याच्या बाजारावर परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार देखील बाजारात गुंतवणूक करत आहेत. या कारणाने सोन्याचे भाव एकदम वाढताना दिसत नाहीत.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी हाजिर 0.04 टक्क्यांनी वाढून 17.57 डॉलर प्रति औंसवर पोहचली. सणासुदीच्या दरम्यान मागील आठवड्यामध्ये सोन्याच्या भावात घसरणं पाहायला मिळाली होती. परंतू आज पुन्हा एका सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली, मागील दोन दिवसात चांदीचे दर कमी होताना दिसत होते मात्र आज पुन्हा एकदा चांदीचे दर वाढले आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी