दिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे स्थानिक सराफ बाजारात देखील सणासुदीच्या दरम्यान सोने महागले आहे. सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात तेजी दिसून आली. बुधवारी सोने 175 रुपयांना महागले. त्यामुळे सोने 39,545 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

उद्योगात मागणी वाढल्याने चांदीच्या दरात देखील चकाकी पाहायला मिळाली. चांदी आज 70 रुपयांनी महागली. चांदी महागल्याने 47 हजार रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

लंडन, न्यूयॉर्कमध्ये आज सोने हाजिर 6.10 डॉलरने वाढून 1,493.75 डॉलर प्रति औंस झाले. डिसेंबरमध्ये अमेरिकी सोने वायदे बाजारात 4.70 डॉलर प्रति औंसने वाढून 1,486.40 डॉलर प्रति औंस झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र चांदीच्या दरात कमी झाली, त्यामुळे चांदी हाजिर 0.15 डॉलरने कमी होऊन 17.55 डॉलर प्रति औंस झाली.

Visit : Policenama.com